लंडन: इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा सलामीवीर रोहित शर्माने शानदार शतक झळकावले. रोहितचे कसोटी क्रिकेटमधील आठवे तर परदेशातील पहिले शतक ठरले. रोहितने षटकार मारून शतक साजरे केले. कसोटी करिअरमधील ४३व्या सामन्यात रोहितला परदेशात शतक करता आले. इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीच्या चेंडूवर त्याने षटकार मारला.

रोहितने २०४ चेंडूत २१ चौकारा आणि १ षटकारासह शतक पूर्ण केले. इंग्लंडविरुद्धचे त्याचे हे दुसरे शतक ठरले. याच वर्षी त्याने भारतात चेन्नईत झालेल्या कसोटीत १६१ धावा करत इंग्लंडविरुद्ध पहिले शतक केले होते. सलामीवीर म्हणून देखील इंग्लंडमध्ये त्याचे हे पहिले शतक ठरले.

शतकी खेळी दरम्यान रोहितने इंग्लंडमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या. इंग्लंडविरुद्ध सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक करणारा रोहित पहिला सलामीवीर ठरला आहे. १२७ धावांवर बाद झाला.

रोहितच्या एका शतकाची कमाल

– आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ११ हजार धावा पूर्ण
– इंग्लंडविरुद्ध वनडे, टी-२० आणि कसोटीत शतक करणारा पहिला सलामीवीर
– कसोटी करिअरमध्ये रोहितच्या ३ हजार धावा
-इंग्लंडच्या मैदानावर दोन हजार धावा पूर्ण

षटकार मारून शतक पूर्ण करणारे भारतीय फलंदाज
सचिन तेंडुलकर- ६ वेळा
रोहित शर्मा- ३ वेळा
ऋषभ पंत- २ वेळा
गौतम गंभीर- २ वेळा

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here