– पं. डॉ. संदीप अवचट

मेष : पती-पत्नीमध्ये वाद होतील. संयमाने सर्व परिस्थिती नियंत्रणात ठेवा. सभोवतालच्या लोकांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू ठराल.

वृषभ : सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यानेच प्रगती साधू शकाल. आर्थिक व्यवहार दक्षतेने करा. तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा.

मिथुन : छोट्या व्यावसायिकांना अनुभवी लोकांकडून मोलाचे मार्गदर्शन मिळेल. सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करा. आळस वाढविणारा दिवस.

कर्क : कौटुंबिक कलहाचे कारण बनू नका. अधिकारशाही गाजविणे घातक ठरेल. नवीन योजना किंवा संकल्प सुरू करताना चाणाक्षपणे सर्व बाबी तपासून घ्या.

सिंह : काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे उत्तम राहील. दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगला आर्थिक लाभ होईल. तुमच्या सल्ल्यामुळे मित्र अडचणीतून बाहेर येईल.

कन्या : परिवारातील इतर लोकांकडून निराशा होईल. तुमच्या मताला महत्त्व दिले पाहिजे, हा आग्रह सोडावा लागेल. कामांच्या आखणीमध्ये बदल करावा लागेल.

तुळ : जीवनाकडे बघताना प्रेमळवृत्ती जागृत ठेवा. अवाजवी खर्चाला पायबंद घाला. न बदलणाऱ्या वस्तुस्थितीचा अधिक विचार करू नका.

वृश्चिक : आध्यात्मिक गुरूंची भेट होईल. मित्राच्या सहकार्यामुळे आर्थिक लाभ होतील. वैयक्तिक पातळीवर आनंददायी घटना घडतील.

धनु : धनलाभाचे योग जुळून येतील. परिवाराबरोबर निसर्गरम्य सहलीला जाणे होईल. आज ग्रहताऱ्यांची उत्तम साथ लाभेल.

मकर : प्रामाणिकपणे काम केल्यास नोकरीत बढती मिळेल. फावल्या वेळात आवडते छंद जोपासाल. महत्त्वाच्या कामांचा विसर पडेल.

कुंभ : सभोवताली घडणाऱ्या सर्व गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करा. कार्यालयीन कामकाज करताना सतर्क राहा. वादविवाद होईल असे वर्तन टाळा.

मीन : क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी व्हाल. महिलांचा घरगुती साफसफाईसाठी वेळ खर्च होईल. आर्थिक करार यशस्वी होतील.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here