कोल्हापूरः कोल्हापूरात शनिवारी रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. ()
कोल्हापूरपासून १९ किलोमीटर कळे गावाजवळ केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे. सौम्य भूकंपाचे धक्के असले तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. भूकंपाच्या भितीने नागरिक रात्री मोठ्याप्रमाणात घराबाहेर पडले.
कोल्हापूरबरोबरच आजूबाजूच्या परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याचबरोबर, सोलापूर जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याबाबतचे वृत्त एका संकेतस्थळानं दिलं आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times