मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री यामी गौतमने मोठ्या पडद्यावर येण्याआधी अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. त्यात ‘फेअर अँड लव्हली’ या जाहिरातीमुळे तिला खूपच लोकप्रियता मिळाली आहे. या जाहिरातीमुळे खूपच वाद निर्माण झाला होता. हा वाद निर्माम झाल्यानंतर यामीने स्वतःला या वादापासून दूरच ठेवले आहे.

‘भूत पोलिस’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी यामी एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. तिथे मोठ्या संख्यने फोटोग्राफर्स उपस्थित होते. त्यावेळी फोटोग्राफर्स तिचे फोटो घेत होते. त्यातील एका फोटोग्राफरने पाठीमागून ‘फेअर अँड लव्हली’ असे जोरात ओरडला. हे ऐकल्यावर यामीचा पारा चांगलाच चढला. रागावलेली यामी म्हणाली, ‘एकदा सांगितले आहे ना… जरा नीट मान देऊन बोला… अशा पद्धतीने हाक मारू नका…’ इतके परखडपणे बोलल्यानंतर यामीने स्वतःच्या रागावर कसेबसे नियंत्रण ठेवले. त्यानंतर तिने हसतमुखाने फोटोग्राफर्सना फोटोसाठी पोझ दिल्या.

दरम्यान, या प्रमोशनच्या कार्यक्रमाला यामीने इजिप्शियन लूकमध्ये आली होती. यामीने त्यावर परंपरागत काश्मिरी कानातले घातले होते.

यामीचा भूत पोलिस हा सिनेमा १७ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. हा सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टार ओटीटीवर रिलीज होणार आहे. या सिनेमात यामीशिवाय सैफ अली खान, अर्जुन कपूर, जॅकलीन फर्नांडिस दिसणार आहेत. ही एक हॉरर कॉमेडी आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here