नागपूरः अंघोळीसाठी कन्हान नदीत उतरलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हे पाचही तरुण यवतमाळमधील दिग्रस येथील बाराभाई मोहल्ला येथील रहिवाशी आहेत.

यवतमाळ येथील दिग्रसमधील १२ तरुण अम्मा दर्गा येथे दर्शनासाठी आले होते. सकाळीच्या सुमारास कन्हान नदीत अंघोळीसाठी उतरले होते. मात्र, नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं पाच युवक बुडाले आहेत. या तरुणांचे मृतदेह अद्याप हाती आले नसून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

नदीचा प्रवाह जास्त असल्यानं शोधकार्य करण्यास अडचणी येत आहेत स्थानिक पथकानं एसडीआरएफ पथकाची मागणी केली आहे. पारशिवणी येथील तहसीलदारांनी एसडीआरएफ नागपूरचे पथक पाठवावे, अशी मागणी केली आहे.

वाचाः

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस भागातील १२ तरुण अम्मांच्या दर्ग्यावर आले होते. त्यातील काही जण कन्हान नदीपात्रात उतरले होते. नदीत पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं हे पाचही युवक बुडाले आहेत. तसंच, नदीच्या पाण्याची पातळीही वाढली होती. तसंच, पाण्याचा प्रवाहदेखील जलद होता, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.


वाचाः

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक दाखल झाले आहे. पोलीस पथकाकडून पाचही जणांचा शोध सुरू असून अद्याप मृतदेह हाती न लागल्याने नागपूर एसडीआरएफचे पथक पाठवावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

मृत तरुणांची नावे

सय्यद अरबाज – २१ वर्ष
ख्वाजा बेग – १९ वर्ष
सप्तहीन शेख- २० वर्ष
अय्याज बेग- २२ वर्ष
मो. आखजुर- २१ वर्ष

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here