सलग ५ व्या दिवशी देशात करोना रुग्णांची संख्या वाढली आहे. रोज ४० हजारांवर नवीन रुग्णांची नोंद होत आहे. देशात गेल्या २४ तासांत ३०९ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात करोनाने ४,४०,५३३ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
केरळमध्ये गेल्या २४ तासांत २९, ६८२ जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले. राज्यात १४२ जणांचा करोनाने मृत्यू झाला. दुसरीकडे केरळच्या कोझिकोडमध्ये निपाह व्हायरसचा पहिला रुग्ण समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एनसीडीसीची एक टीम केरळ रवाना करण्यात आली आहे. ही टीम आज दाखल होईल. ही टीम राज्याला तांत्रिक मदत करेल. निपाह व्हायरसमुळे राज्यात १२ वर्षांच्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात शनिवारी करोनाचे ४ हजारांहून अधिक रुग्ण आढळले. तर ६४ जणांचा करोनाने मृत्यू झाला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times