गणेशोत्सवाच्या आधी चिपी विमानतळ प्रवाशांसाठी सुरू होणार असल्याचा दावा आधी करण्यात येत होता. मात्र, आता पुन्हा एकदा विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे. नवरात्रोत्सावाचा मुहूर्त जवळपास निश्चित झाला आहे. विनायक राऊत यांनी तसे संकेत दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी मी दिल्लीत होतो. मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, एव्हीकेशन प्राधिकरणाचे सचिव, डीजीसीएचे चेअरमन आणि हवाई वाहतूक करणारी अलायन्स कंपनी या सर्वांशी मी संपर्क साधला. त्यावेळी येत्या ७ ऑक्टोबरपासून चिपी विमानतळ वाहतुकीसाठी सज्ज आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली आहे.
दरम्यान, चिपी विमातळाचे उद्घाटन ७ ऑक्टोबर रोजी करण्यात यावे व त्यादृष्टीने तयारी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना द्यावे, अशी मागणी करणारे निवेदन विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांना दिले आहे. यावेळी मंत्री अनिल परब व खासदार अनिल परब उपस्थित होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times