खासदार राऊत हे आज पुण्यातील आज शिरुर-हवेली येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करत होते. त्यावेळी त्यानी थेट चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. राऊत म्हणाले की, चंद्रकांतदादा हरिश्चंद्राचे अवतार आहेत. आम्ही एकत्र काम केले आहे. मी तर नेहमीच आव्हान देत आलो आहे की शरद पवार यांनी पाठीत खंजीर खूपसल्याचे एक उदाहरण दाखवा, मी राजकारण सोडतो. ही मराठ्यांची औलाद आहे. आम्ही समोरून वार करतो, छत्रपती शिवाजी महाराज यांना अफझल खानाचा समोरून कोथळा काढला होता, असा टोलाही त्यांनी पाटील यांना लगावला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. आम्ही पाठीमागून वार करत नाही. समोरून कोथळा काढतो, असे मी म्हटले होते तर याचा त्यांना एवढा त्रास झाला की त्यांनी थेट गुन्हेच दाखल करायला सांगितले. समोरून वार केल्यावर काय निघणार? कोथळाच निघणार ना, असेही राऊत यांनी पुढे म्हटले.
क्लिक करा आणि वाचा-
चंद्रकांत पाटील यांना महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार आलेले सहन होत नाही. पण, जेवढे तुम्ही तडफडत राहाल तेवढी तुमची शक्ती क्षीण होईल. यावेळी त्यांनी आघाडीच्या नेत्यांनाही कानपिचक्या दिल्या. आघाडीच्या नेत्यांनीही विरोधकासारखे वागू नये. मी आज वरीष्ठांशी बोलेन. ऐकले तर पाहू नाहीतर शिवसेनेच्या भाषेत त्यांना सांगू, असेही राऊत म्हमाले. कोण आला रे कोण आला, ही घोषणा भाजपात दिलेली पाहिली आहे का कधी?, ती फक्त शिवसेनेत ऐकायला मिळते, असा टोलाही राऊत यांनी पाटील यांना लगावला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times