: नवी दिल्ली : ओवल मैदानावर खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस भारतीय फलंदाजांच्या नावावर राहिला. भारताने दुसऱ्या डावात ३ बाद २७० धावा केल्या. भारतीय संघ पहिल्या डावात फक्त १९१ धावांमध्ये गुंडाळला गेला, पण दुसऱ्या डावात सलामीवीर रोहित शर्माने शानदार शतक झळकावत भारतीय संघाचे आव्हान पुन्हा जिवंत केले. रोहित शर्माने परदेशी भूमिवर पहिल्यांदाच कसोटी शतक झळकावताना १२७ धावांची खेळी केली.

विशेष गोष्ट म्हणजे, रोहित शर्माच्या शतकानंतर वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर ट्रेंड व्हायला सुरुवात झाली. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे रोहितने षटकारासह आपलं शतक पूर्ण केलं. रोहित ९५ धावांवर असताना त्याने मोईन अलीच्या चेंडूवर लांब षटकार ठोकला. यानंतर सोशल मीडियावरील चाहत्यांनी रोहितची तुलना वीरेंद्र सेहवागशी करण्यास सुरुवात केली. रोहितने सेहवागच्या शैलीत त्याचे शतक पूर्ण केले आहे, असं सर्वांचं म्हणणं होतं. पण षटकारासह शतक ठोकण्यात रोहितनं वीरेंद्र सेहवागला खूप मागे टाकलं आहे.

रोहित शर्माने दहा वेळा षटकार ठोकून क्रिकेटच्या सर्व स्वरूपात आपले शतक आणि द्विशतक पूर्ण केले आहे. दुसरा कोणताही भारतीय त्याच्या जवळपासही नाही. सचिनने षटकारांसह ६ शतके पूर्ण केली आहेत, पण ती सर्व कसोटी स्वरूपात आहेत. सेहवागने दोन वेळा षटकार ठोकून आपले तिहेरी शतक पूर्ण केले आहे. कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाले, तर रोहित शर्माने तिसऱ्यांदा षटकार ठोकून शतक पूर्ण केलं आहे. त्याच्यानंतर गंभीर आणि रिषभ पंतचा क्रमांक लागतो. त्यांनी प्रत्येकी दोन वेळा षटकार ठोकून शतके साजरी केली आहेत.

रोहितशिवाय इंग्लंडमध्ये असा पराक्रम कोणीही करू शकलं नाही
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात इंग्लंडच्या भूमीवर शतक करणारा रोहित शर्मा हा एकमेव परदेशी खेळाडू आहे. एवढंच नाही, तर इंग्लंडच्या ७ मैदानांवर शतक झळकावणारा तो जगातील एकमेव परदेशी फलंदाजही आहे. एजबेस्टन, ब्रिस्टल, लीड्स, मँचेस्टर, साउथम्प्टन, नॉटिंगहॅम आणि आता द ओव्हल या ठिकाणी रोहित शर्माने शतके केली आहेत. रोहित शर्माने इंग्लंडमध्ये एकूण ९ शतके केली आहेत. इंग्लंडमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके करणाराही तो फलंदाज ठरला आहे. त्याने ८ शतके झळकावणाऱ्या राहुल द्रविडला मागे टाकले आहे. डॉन ब्रॅडमन यांनी इंग्लंडमध्ये सर्वाधिक ११ शतके केली आहेत. शतकापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे रोहित शर्मा पहिल्यांदाच कसोटी मालिकेत ७०० पेक्षा जास्त चेंडू खेळला आहे. कठीण खेळपट्ट्यांवर दीर्घकाळ टिकण्याची क्षमता रोहितने तयार केल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

ओवल कसोटीत शतक करताना रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधील ३ हजार धावांचा पूर्ण केला. त्याने ७४ डावांमध्ये हा पराक्रम केला. यासाठी विराट कोहलीला ७३ डाव लागले होते. एवढंच नाही, तर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणूनही ११ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here