खलनायिकेच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत शालिनीची भूमिका साकारणाऱ्या माधवी निमकर हिने. शा…ली…नी हे शालिनीच्या तोंडातील वाक्य प्रेक्षकही त्याच ठसक्यात बोलू लागले आहेत. तर दुसरा क्रमांक पटकावला आहे ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजना म्हणजे रुपाली भोसले हिने. मालिकेतील संजनाची भूमिका कितीही वाईट असली तरी तिची फॅशन आणि तिचे संवाद बोलण्याची पद्धत प्रेक्षकांना पसंत पडत आहे. तिसऱ्या क्रमांकावर ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील मालविका म्हणजे आदिती सारंगधर आहे. ओम आणि स्वीटूच्या नात्यात दुरावा आणण्यात मालविका यशस्वी झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा मालविकावरचा राग आणखीनच वाढला आहे. त्यामुळेच मालविकाचं काम प्रेक्षकांना पसंत पडत आहे.
चौथ्या क्रमांकावर ‘नव्याने सुरू झालेली मालिका ‘जीव माझा गुंतला’ मधील चित्रा म्हणजे प्रतीक्षा मुणगेकर आहे. मालिकेतील चित्राची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. आणि पाचव्या क्रमांकावर ‘सांग तू आहेस का’ मालिकेतील सुलक्षणा म्हणजेच सुरेखा तळवलकर आहेत. आगळ्यावेगळ्या विषयावर आधारलेल्या या मालिकेतील सुलेखा यांच्या भूमिकेचं प्रेक्षक कौतुक करत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times