शिक्षकांबद्दल पवार यांनी म्हटलं आहे, ‘अंधारातही दृष्टी देणारे, अडचणीत मार्ग दाखवणारे, कधीही निवृत्त न होणारे आणि सुसंस्कृत समाज घडवणारे शिल्पकार कोण असतील तर ते शिक्षक. शीलवान, क्षमाशील, कर्तव्यनिष्ठ असंही शिक्षकांविषयी सांगितलं जातं. लौकिकार्थाने शिक्षक म्हणजे फक्त शाळा-कॉलेजात विद्यार्थ्यांना शिकवणारे नाही तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्ग दाखवणारे हे शिक्षक असतात. अशा असंख्य शिक्षकांनी मला घडवलंय. माझी आई (सौ. सुनंदाताई पवार) आणि बाबा (राजेंद्रदादा पवार) हे माझे पहिले शिक्षक. पहिलं पाऊल उचलायला शिकवल्यापासून नंतर मागे वळून न पाहता केवळ चालत रहायला आणि चालताना सर्वांना सोबत घ्यायलाही त्यांनीच मला शिकवलं. त्यामुळं आज मी जो काही आहे त्यात सर्वांत मोठा वाटा आई-बाबांचा आहे.
क्लिक करा आणि वाचा-
शाळा-कॉलेजमध्ये असताना मला लाभलेल्या सर्वच शिक्षकांनी मला घडवलं, योग्य वेळी कौतुक केलं आणि चूक झाली तेंव्हा कानही पकडले. पण व्यापक अर्थाने जेंव्हा मी विचार करतो तेंव्हा जीवनाचं मूल्य, सामाजिक जाण, नैतिकता, संयम, सत्य, कणव, दुसऱ्यासाठी वेळ देणं, त्यांच्या अडचणी सोडवणं या सर्व गोष्टी मला कळत नकळत समाजात भेटलेल्या असंख्य माणसांकडून उमगल्या, असे पवार म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
विरोधकांकडूनही शिकायला मिळाले
राजकीय प्रांतात आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई आणि अजितदादा यांच्याकडून जे शिकायला मिळालं आणि मिळतं त्याची तुलना तर कशाहीही होऊ शकणार नाही. विरोधकांकडूनही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. व्यक्ती लहान असो की मोठी, पदावर असो की सामान्य माणूस असो. अशा प्रत्येकाकडून मला नेहमीच काही न काही शिकायला मिळतं. सार्वजनिक जीवनात भेटलेले पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आप्तेष्ट, मित्र, लहान मुलं, माझ्यावर प्रेम करणारी मंडळी, माझ्या मतदारसंघातील नागरीक एवढंच काय रस्ता चुकल्यावर मार्ग दाखवणारा रस्त्यातील प्रत्येक वाटसरू हे सर्वजण माझे शिक्षक आहेत.’ असे म्हणत या सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times