आज राज्यात झालेल्या ६७ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ९४ हजार ७६७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के इतके झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या किंचित घटली
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजार ०९५ वर आली आहे. काल ही संख्या ५२ हजार ०२५ वर होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १२ हजार ३२५ वर गेला आहे. ठाणे जिल्ह्यात मात्र ही संख्या वाढून ती ७ हजार २७३ वर आली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ६ हजार ६०३ इतकी खाली आली आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ५ हजार ७०१ वर घसरली आहे. तर, सांगलीत एकूण ३ हजार २५१ इतकी आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या २ हजार ८९६ वर खाली आली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
मुंबईत उपचार घेत आहेत ४,००३ रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ४ हजार ००३ इतकी वाढली आहे. तर, रत्नागिरीत १ हजार ०८७, सिंधुदुर्गात ९३०, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८४९ इतकी आहे.
नंदूरबार, धुळे आणि वर्ध्यात प्रत्येकी दोन सक्रिय रुग्ण
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४७७, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ५६ वर खाली आली आहे. अमरावतीत ही संख्या ९६ वर आली आहे. राज्यात नंदुरबार, धुळे आणि वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्ण असून हीच राज्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.
क्लिक करा आणि वाचा-
२,९९,९०५ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ४८ लाख ५४ हजार ०१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ८६ हजार १४७ (११.८२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९९ हजार ९०५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ००७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times