‘मला माहित आहे की, हा चुकीचा प्रश्न आहे, पण तरीही…’
प्रसिद्ध डिझायनर राजीव सेठी यांनी नीरजला प्रश्न विचारला की, तो त्याचे लैंगिक जीवन आणि प्रशिक्षण कसं बॅलन्स करतो? मुलाखतीवेळी सेठी यांनी नीरजचा सुंदर व्यक्ती असा उल्लेख केला होता. सेठी म्हणाले की, देशातील करोडो लोकांना विचारायचं असेल, तसंच मीही विचारतो. तुम्ही तुमचं भालाफेकचं प्रशिक्षण आणि तुमचं लैंगिक जीवन कसं संतुलित करता? मला माहित आहे की हा एक चुकीचा प्रश्न आहे, पण त्यामागे एक गंभीर प्रश्न दडला आहे.’
राजीव सेठी यांच्या प्रश्नानंतर नीरज नाराज झाला होता. माफ करा, सर असं म्हणून त्याने प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं.
तुमच्या प्रश्नाने माझं मन भरलं
सेठी यांच्या प्रश्नावर पुढे बोलताना नीरज म्हणाला की, माफ करा असं मी म्हटलं आहे. यावरून तुम्हीच जाणून घेऊ शकता. तरीही सेठी यांनी हार मानली नाही, त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला. यावर मुलाखत नियंत्रक म्हणाले की, नीरजला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाहीय. त्यावेळी सेठी म्हणाले की, मला माहीत होतं. मग नीरज म्हणाला, ‘प्लीज सर! तुमच्या प्रश्नाने माझं मन भरून गेलं आहे.’
ट्विटरवरून नेटकऱ्यांनी सेठींना सुनावलं
नीरजला अस्वस्थ करणारा प्रश्न विचारल्यानंतर नेटकऱ्यांनी सेठी यांच्यावर निशाणा साधला आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की ‘सेक्स लाइफबद्दल विचारून राजीव सेठीला करण जोहरसारखं व्हायचं होतं, पण नीरज चोप्रानं हार्दिक पांड्यासारखं उत्तर न देता त्यांना निराश केलं.’ काहींनी म्हटले आहे की, ‘जर हे एखाद्या मुलीसोबत घडले असते, तर त्याला लैंगिक शोषण म्हटले गेले असते!’ सामान्य लोकांनी नीरजला त्याच्या तयारी आणि संघर्षाबद्दल प्रश्न विचारले असते, सेठी काय विचारत आहेत, असं आणखी एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times