राऊत यांच्यावर टीका करताना रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाला बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते, सुरेश प्रभू आणि यांचा वारसा लाभलेला आहे. आज हे दुर्दैव आहे की एक बुद्धू खासदार आम्हाला मिळाला आहे, अशा शब्दांत नितेश राणे यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
नितेश राणे यांच्याप्रमाणेच नीलेश राणे यांनीही राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. खासदार विनायक राऊत यांनी एक पत्र जाहीर केले असून त्यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले आहे, असे सांगत त्यांनी शेलक्या शब्दात खासदार राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली. विनायक राऊत हे बिनडोक असल्याचे आपण अनेक वर्षांपासून सांगत आहोत. आम्ही नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे या बाबत चौकशी केली असता, अशा प्रकारची कोणतीही परवानगी अद्याप दिली गेली नसल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. अधिकृत नोटिफिकेशनही निघालेले नाही. मग असे असताना हे खासदार कोणत्या अधिकाराखाली उद्घाटनाचे कार्यक्रम अधिकाऱ्यांना करायला सांगत आहेत, असा सवाल नीलेश राणे यांनी विचारला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
ज्यांनी कधी ऑटोस्टॅंड बांधला नाही, अचानक त्यांना मतदारसंघ मिळाला आणि विमानतळाच्या उद्घाटनाचा विषय निघाला की ते असेच वाबचळणार, असे सांगत विनायक राऊत ही बोगसगिरी थांबवा असे आवाहन त्यांनी राऊत यांना केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times