मुंबईः राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री (Anil Parab) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. परब यांचे निकटवर्तीय समजले जाणारे बजरंग खरमाटे यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणी खरमाटे यांची ईडीकडून चौकशी होणार आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) अधिकारी बजरंग खरमाटे हे अनिल परब यांचे विश्वासू मानले जातात. खरमाटे यांना ईडीने नोटीस बजावली असून आज मनी लाँडरिंग प्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. ईडीकडून खरमाटे यांना पहिल्यांदाच नोटीस बजावण्यात आली आहे. अनिल परब यांच्या निकटवर्तीयांना नोटीस बजावल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याची सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी खरमाटे यांच्या मालमत्तांवर ईडीने छापे मारले होते. पोलिसांच्या बदल्यांमध्ये खरमाटे यांचा सहभाग असल्याचे पुढे आल्याने ‘ईडी’ने ही कारवाई केली होती. त्यामुळं आज खरमाटे यांची ईडीकडून होणारी चौकशी महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनाही ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, माझे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने मी चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. त्यामुळे मला दोन आठवड्यानंतरची वेळ द्यावी’, असे पत्र अनिल परब यांनी ईडी कार्यालयाला पाठवले होते.

वाचाः

काय आहे प्रकरण?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबतीत तपास सुरू केल्यानंतर बडतर्फ पोलीस अधिकारी यांच्या चौकशीत महत्त्वाची माहिती समोर आली होती. त्यानुसार या प्रकरणात अनिल परब यांचाही सगभाग असल्याचा संशय ईडीला आहे. मुंबई महापालिकेतील ५० कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये खंडणी गोळा करण्याची सूचना अनिल परब यांनी जानेवारीमध्ये दिली होती, असे वाझे याने न्यायालयालादेखील सांगितले आहे. या सर्व माहितीनुसार यामध्ये पैशांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचा संशय आहे. त्यामुळेच प्रकरणाच्या प्रत्यक्ष चौकशीसाठी परब यांना हा समन्स बजावण्यात आला आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here