सोलापूर : अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ आणि माढा तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे मोहोळ, उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात सीनेला पूर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ( river flooded many villages)

उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणीचा पूल पाण्याखाली गेला असून पुलावरून पाच फूट पाणी वाहत आहे तर पाकणी व विरवडे गावचा संपर्क तुटला आहे. अचानक झालेल्या या मुसळधार पावसामुळे हा पूर आला आहे. या अनपेक्षित पुरामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या वर्षी सन २०२० लाही सीनेला असाच अनेक वर्षांनंतर मोठा पूर आला होता. त्यावेळी सोलापूर मंगळवेढा, सोलापूर विजापूर संपर्क तुटला होता. हजारोंच्या घरांचे नुकसान झाले होते. शेतीचे मोठे नुकसान झाले होते. आता सलग पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने नदीचे पाणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, सीना नदी काठावरील दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड, औराद गावामधील पुलावरून पाणी वाहत आहे. हंद्राळ गावातील नदीकाठावरील शेतात पाणी शिरले आहे. तहसीलदार अमोल कुंभार यांनी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून पाणी आणखी वाढल्यास नदीकाठी असणाऱ्या घरांचे स्थलांतर केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ति-हे गावच्या सीना नदीचा रौद्ररूप दिसत आहे पाण्याचा प्रवाह आणि पाऊस आणखी वाढला तर ति-हेचा जुना पूल ही पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (solapur weather river flooded many villages)

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here