रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात आंजर्ले समुद्रामध्ये एक बोट बुडाली असल्याची माहिती समोर येत आहे. रत्नागिरीमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. अशात समुद्रही खवळला असताना बोट बुडाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वासुदेव वाशा दोरकुळकर यांची बोट क्रमांक- ७२४ सिद्धिसागर नावाची दोन सिलेंडरची बोट बुडाली आहे. सर्व खलाशी सुखरूप असुन दोनजण पोहून आले तर दोन खलाशी दुसऱ्या बोटीने वाचवले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

किनाऱ्यावर लगली आहे ती बोट बुडण्याचा धोका होता मात्र ही बोट वाचवण्यात यश आले आहे. प्रकाश दोरकूळकर यांची बोट दुसऱ्या बोटीच्या मदतीसाठी गेली होती,इंजिन बंद पडल्याने ही बोट बुडणार होती,किनाऱ्याजवळ असल्याने यातील खलाशांनी उड्या टाकुन जवळच किनारा गाठला. दरम्यान या बोटीलाही वाचवण्यात यश आले. सलग तिसऱ्या वर्षी हा प्रकार या परिसरात घडला आहे.दरम्यान या घटनेचे वृत कळताच बंदर अधिकरी दीप्ती साळवी व काही अधिकारी,पोलीस घटनास्थळाकड़े रवाना झाले आहेत.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here