: तालुक्यात आज दुपारपासून मुसळधार पाऊस (Chiplun Rain Updates) कोसळत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे चिपळुणात पुन्हा पूरस्थिती निर्माण होईल का, अशी भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. नगरपालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी चिपळूण नगरपालिका आणि पूरबाधित ग्रामपंचायतींना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मात्र वाशिष्ठी नदी पात्राने अद्याप धोक्याची पातळी ओलांडली नसल्यामुळे थोडा दिलासा आहे. पावसाचा असाच धुमाकूळ आणखी २४ तास सुरू राहिल्यास नदीपात्रामध्ये वाढ होऊ शकते, असं जाणकारांचं मत आहे.

चिपळूण शहरात नगरपालिकेची गाडी फिरत असून नागरिकांना सतर्क राहाण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. अजूनही मुसळधार पाऊस सुरू असून या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.

दरम्यान, जुलै महिन्यात चिपळूण तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला होता. पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. नागरिकांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. तसंच दरड कोसळल्याने काही जणांनी आपला जीवही गमावला. या धक्क्यातून अद्याप जिल्हा सावरलेला नसतानाच पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here