म. टा. प्रतिनिधी,

असल्याने फिरायला गेलेल्या जळगावातील उच्चशिक्षित तरुणासह त्याचा मित्र पाण्यात बुडाल्याची दुर्देवी घटना रविवारी बुरहाणपूर जिल्ह्यातील बसाली येथे घडली. आज सोमवारी दुपारी एकवीस तासांनंतर या तरुणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. अक्षय उर्फ उज्ज्वल राजेंद्र पाटील (वय २३, रा. खेडी) व जयेश रवींद्र माळी (वय २४, रा. वाघनगर) असे मृत तरुणांची नावे आहेत. ( while going on a in )

मृत जयेश माळी याचा रविवारी वाढदिवस असल्याने जळगावातून जयेश, उज्ज्वलसह १७ तरुण बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील बसाली या धबधब्याच्या ठीकाणी सहलीसाठी गेले होते. सायंकाळी चार वाजता धबधब्याखाली अंघोळ करीत असताना जयेश व उज्ज्वल यांचा पाय घसरल्यामुळे ते ३० फुट खोल पाण्यात बुडाले. बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत असाना ते पाण्याच्या काठाशी असलेल्या कपारीत अडकले. सोबतच्या तरुणांनी आरडा-ओरड करुनही पाणी खोल असल्याने त्यांना बाहेर काढता आले नाही.

क्लिक करा आणि वाचा-
बुरहाणपूर पोलिसांनी माहिती मिळाल्यानतंर त्यांनी घटनास्थळ गाठले. रात्र झाल्यामुळे अंधारात दोघांचा शोध घेणे देखील शक्य झाले नाही. ही माहिती जळगावातील नातेवाईक, कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी रात्रीच बुरहाणपूर येथे धाव घेतली होती. सोमवारी सकाळी सात वाजेपासून पुन्हा शोधमोहिम सुरू करण्यात आली. आज सोमवारी दुपारी १ वाजता दोघांचे मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले. यावेळी तेथे उपस्थित असलेले कुटुंबीय, नातेवाईकांची प्रचंड आक्रोश केला. सायंकाळी पाच वाजता शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा दोघांवर जळगावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा-

जयेशचा होता वाढदिवस

मृत जयेश हा अभियांत्रिकीच्या तीसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होता. गतवर्षी तो चेन्नई येथे इंडियन ऑईल या कंपनीत एकवर्षासाठी नोकरीस होता. काही महिन्यांपासून तो घरीच अभ्यास करीत होता. मित्रांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याने बसाली येथे जाण्याचे नियोजन केले होते. त्याच्या पश्चात आई वडील व लहान भाऊ आहे.उज्ज्वल हा खेडीमध्ये मामा रमेश पाटील यांच्याकडे रहायला होता. एमबीएचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर तो सध्या एका खासगी कंपनीत मार्केटींगचे काम करीत होता. त्याचे वडील एका शोरुममध्ये प्रतिनिधी आहेत. आई सुनिता ह्या गृहीणी आहेत. तर लहान भाऊ शुभम हा देखील जयेश सोबत बसाली येथे गेले होता.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here