नवी दिल्लीः भारतात राहणाऱ्या अफगाण नागरिकांना गृह मंत्रालयाच्या परवानगीशिवाय देश सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. भारतात येणाऱ्या अनेक अफगाण नागरिकांना आपल्या देशातील नव्या सत्ताधीशांची भीती आहे. गृह मंत्रालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय परराष्ट्र क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाद्वारे (एफआरआरओ) कोणत्याही अफगाण नागरिकाला भारत सोडण्यास सांगितलं जाणार नाही. अशा प्रकारची प्रकरणं एफआरआरओ गृहमंत्रालयाकडे पाठवेल, असं अधिकाऱ्याने सांगितलं. अफगाणिस्तानच्या महिला खासदार रंगीना कारगर यांच्याकडे वैध कागदपत्र असूनही दिल्लीच्या आयजीआय विमानतळावरूनच इस्तंबुलला पाठवण्यात आलं. यानंतर हे आदेश दिले गेले.

अफगाणिस्तानसह सर्व देशांचे भारतात राहणाऱ्या नागरिकांचा व्हिसा निःशुल्क आधारावर ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा करण्यापूर्वी अफगाण नागरिक भारतात सहा महिन्यांहून अधिक काळापासून आणि तर अनेक नागरिक २०२० च्या पहिल्या लॉकडाउनच्या घोषणेपासून भारतात राहात आहेत.

केंद्र सरकारने ई व्हिसा किंवा थांबण्याचा कालावधी कुठल्याही अटीशिवाय ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. यामुळे विदेशी नागरिकांना एफआरआरओकडे व्हिसा वाढवण्यासाठी अर्ज करण्याची गरज पडणार नाही. आता देश सोडण्यासाठी त्यांना आधी परवानगीसाठी अर्ज करावा लागेल. तसंच एफआरआरओ कुठल्याही दंडाशिवाय त्यांना मंजुरी देईल. अनेक अफगाण नागरिकांना तालिबानची भीती आहे. यामुळे त्यांनी भारतात राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here