पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी काल हिंदू या शब्दाबद्दल केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी तिरकस प्रतिक्रिया दिली आहे. ‘मोहन भागवत यांच्या वक्तव्यामुळं माझ्या ज्ञानात भर पडली आहे,’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ( taunts RSS Chief Mohan Bhagwat)

ते पुण्यात बोलत होते. ‘आपली मातृभूमी आणि गौरवशाली परंपरा हा देशातील एकतेचा आधार आहे. हिंदू हे कुठलेही जातिवाचक अथवा भाषावाचक नाम नाही, जगातील प्रत्येक व्यक्तीचा विकास, उत्थान आणि मार्गदर्शन करणाऱ्या परंपरेचं नाव आहे. भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच आहेत. आमच्या दृष्टीने हिंदू हा मातृभूमी, पूर्वज, तसेच भारतीय संस्कृतीचा वारसा याचा प्रतिशब्द आहे,’ असं भागवत काल म्हणाले होते. त्यावर पवारांना विचारलं असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

वाचा:

महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे लागलेल्या ईडीच्या ससेमिऱ्याबाबतही पवार यांनी मत मांडलं. ‘वेगवेगळ्या प्रकरणांच्या तपासासाठी राज्य पातळीवर स्वतंत्र यंत्रणा आहेत. वेगवेगळे आयोग असतात. राज्याचं गृहखातं असतं. तिथं संबंधितांना तक्रार करता येते. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांत नवीनच यंत्रणा लोकांना माहीत झाली आहे. ईडी कुणाच्या मागे कशी लागेल सांगता येत नाही. ही यंत्रणा अनेकांना त्रास देत आहे. राज्यातील प्रत्येक संस्थेच्या कारभारात ईडीनं जाऊन हस्तक्षेप करणं हा राज्य सरकारच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार आहे. या गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत. याबाबत संसदेत आवाज उठवू, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here