गणेशोत्सवानिमित्त आज कोकणात जाण्यासाठी मुंबईतील दादर टर्मिनसवरून सावंतवाडीपर्यंत जाणाऱ्या मोदी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मोदी एक्स्प्रेस सुरू होण्यापूर्वी नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत शिवसेनेवर हल्लाबोल केला. करोनाचा उद्रेक झाल्यामुळे लोकांना गेल्या दोन वर्षांपासून कोकणात जात आलेले नाही. मात्र ती उणीव आज भरून निघाली आहे. मी विरोधी पक्षात बसलेल्या भाजपचा कोकणातील फक्त एक आमदार आहे. उर्वरित सर्व आमदार हे शिवसेनेचे आहेत. असे असतानाही मी एकट्याने एक ट्रेन सोडली. मग उर्वरित सर्व सत्ताधारी आमदारांनी मिळून अर्धी ट्रेन तरी सोडायला हवी होती, असा टोला लगावला.
क्लिक करा आणि वाचा-
आता कोकणातील जनतेने समजून घ्यावे की भाजपचा एक आमदार असताना एक ट्रेन सोडली जाते, तर मग भाजपचे सर्व आमदार असते तर किती ट्रेन सुटल्या असत्या.
क्लिक करा आणि वाचा-
आघाडी सरकारवर सोडले टीकास्त्र
करोनाच्या संकटाचा विचार करताना आघाडी सरकारला फक्त हिंदूंचेच सण दिसतात. मंत्री नितीन राऊत यांनी सरकारमध्ये बसलेल्या करोना स्प्रेडपकडे पाहावे. ते मोठे कार्यक्रम घेत गर्दी करत आहेत. त्यांना थोडी ताकीद द्या आणि मग गणेशोत्सवावर विघ्न आणा, असे राणे यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times