कल्पिता पिंपळे यांनी हा गौप्यस्फोट करताना म्हटले की, मी अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी गेले असताना माझी दोन बोटे छाटली गेली, असे चित्र रंगवले जात आहे. आमच्या बदल्या झाल्या आणि आम्ही अनधिकृत बांधकामे तोडण्यास सुरुवात केली. मी आल्यानंतर अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरू केली. त्यानंतर अनधिृत धाब्यांवर देखील कारवाई सुरू केली. या कारवायांनंतर मग मी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली. फेरीवाल्यांना जर त्यांचा निषेध नोंदवायचा असता, तर त्यांनी ही घटना घडल्यानंतर प्रतिक्रिया त्यांनी दिली असती. माझ्या कर्मचाऱ्यांवर त्यांनी हल्ला केला असता. मात्र, मी सगळी कारवाई केल्यानंतर चार-पाच मिनिटांनी माझ्यावर मागून हल्ला झाला. या हल्ल्यामागे फेरीवाला आहे असे मला वाटत नाही. या मागे अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबावी हेच कार असेल, असे स्पष्ट करताना माझ्यावरील हा हल्ला घडवून आणलेला हल्ला आहे असे मला वाटते असे कल्पिता पिंगळे म्हणाल्या.
क्लिक करा आणि वाचा-
या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला नक्कीच न्याय देतील याची मला खात्री आहे. हे स्फुल्लिंग विझता कामा नये. आम्ही कारवाई करतच राहू, कारण कारवाई करण्यासाठीच आम्ही आहोत. ते आमचे कर्तव्यच आहे. माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे. या हल्ल्यात माझी दोन बोटे गेली आहेत. पण ठीक आहे यामध्ये जर मी माझा जीव गमावला असता, तर माझा मुलगा अनाथ झाला असता, असे सांगतानाच माझ्या भावाला बहीण मिळाली असती का? माझ्या आईला मुलगी मिळाली असती?, असे सवाल पिंगळे यांनी उपस्थित केले आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
‘मी पुन्हा कारवाई सुरू करेन’
फेरीवाला इतका आक्रमक कधीच होत नाही. कारण फेरीवाल्यावरील अशा प्रकारची कारवाई नवीन नाही. मी या क्षेत्रात गेली ११ वर्षे काम करत आहे. अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाईला ब्रेक लागावा हा यामागील उद्देश आहे, असे सांगत मी कामावर रुजू झाले की पुन्हा कारवाई सुरू करेन, असा संकल्पही त्यांनी सोडला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times