मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस. सावरकर गौरव प्रस्तावावरून महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा कालचा प्रयत्न फसल्यानंतर विरोधक आज सभागृहात नेमकी काय भूमिका घेणार, याकडं लक्ष लागलं आहे. मराठी भाषेच्या सद्यस्थितीवरून वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

लाइव्ह अपडेट्स:

>> मराठी भाषेच्या वाढीसाठी गुंडी यांनी सरकारला केल्या अनेक सूचना

>> ज्येष्ठ लेखिका निलिमा गुंडी यांनी केलं सोहळ्यात मार्गदर्शन

>> मराठी भाषा दिनानिमित्त विधान भवनात विशेष सोहळ्याला सुरुवात

>> विधान भवनाच्या आवारात १२ बलुतेदारांचं चित्रप्रदर्शन

>> मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं निघालेल्या दिंडीत सत्ताधारी-विरोधक एकत्र

>> ‘अभिजात मराठी’साठी विधानसभेत आज ठराव मांडला जाणार

>> विधान भवनाच्या आवारातील पुस्तक प्रदर्शनाच्या स्टॉलला मुख्यमंत्र्यांनी दिली भेट

>> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रंथदिंडीमध्ये सहभागी
>> विधान भवन परिसरात मराठीचा जागर, ग्रंथदिडी आणि पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन

>> मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठीच्या सद्यस्थितीविषयी चर्चेची शक्यता

>> राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here