बेळगाव एकीकरण समितीचा बेळगावात पराभव झाल्यानंतर पेढे काय वाटता?, मराठी माणसाचा पराभव झालेला असताना पेढे वाटायला लाज वाटली पाहिजे, अशी टीका खासदार राऊत यांनी भाजपवर केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना, बेळगावात मराठी माणसाचा नाही, तर संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झाला आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यावर आता राऊत यांनी उत्तर देत हे आवाहन दिले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
फडणवीस यांना उत्तर देताना खासदार राऊत म्हणाले की, महाराष्ट्र भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव हा महाराष्ट्राचा आहे की नाही एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे. तो कुणाचा काय अहंकार आहे ते नंतर बघू. बेळगावात मराठी एकजुटीचा विजय झालाच पाहिजे असे बोलणे म्हणजे अहंकार आहे की ती मराठी अस्मिता आहे हे राज्यातील ११ कोटी मराठी जनतेलाच ठरवू द्या.
क्लिक करा आणि वाचा-
महाराष्ट्र भाजपाकडून दोन अपेक्षा आहेत
खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपकडून दोन अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. बेळगावातील विजयी मराठी उमेदवारांना मुंबईतील हुतात्मा स्मारका समोर डोके टेकून महाराष्ट्र अस्मितेची शपथ घ्यायला लावा आणि बेळगाव पालिकेत महाराष्ट्र त विलीन होण्या बाबत दोन ओळींचा ठराव मंजूर करा, अशा दोन अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केल्या आहेत. या दोन अपेक्षा मांडताना हे मंजूर आहे का, असा सवाल त्यांनी भाजपला विचारला आहे. अहंकार बाजुला ठेवून हे एवढे कराच, असा टोलाही त्यांनी शेवटी भाजपला लगावला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times