रेल्वे स्थानकातून अल्पवयीन मुलीला मदतीच्या बहाण्याने बाहेर नेऊन तिच्या १३ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, १४ जणांना अटकही करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर वाघ यांनी बुधवारी दुपारी पोलिस आयुक्तालयात जाऊन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
क्लिक करा आणि वाचा-
‘अॅट्रॉसिटी’मुळे आरोपींना जामीन मिळण्यापासून मुदतीत निकाल लावण्यापर्यंतची एक चौकट आखली जाईल. त्यातूनच महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांना चाप बसेल, अशी शक्यताही वाघ यांनी व्यक्त केली. दरम्यान, वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने केलेल्या आरोपांबाबत वाघ म्हणाल्या की, त्यांचा संसार वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. यापूर्वीही त्यांच्या सुनेच्या पाठीशी होतो आणि आताही राहू.”
क्लिक करा आणि वाचा-
‘त्या’वेळी तत्परता दाखवली असती, तर…
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराचा प्रकार समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने पावले उचलत दोन दिवसात सर्व आरोपींनी अटक केली. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक आहे. मात्र, वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत महमंदवाडी येथे एका तरुणीने आत्महत्या केली होती. तत्कालिन मंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणाशी संबंध आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी आता सारखीच तत्परता दाखवली असती, तर काय झाले असते, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. दरम्यान, पुणे पोलिसांना ‘ते’ प्रकरणी तडीस न्यायचेच नव्हते. त्यामुळेच अजूनही त्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असा आरोपही वाघ यांनी केला.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times