मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाकडे दोन प्रवाशांना घेऊन निघालेली ही कार मरीन ड्राइव्ह इथे आल्यानंतर कारमधून धूर येऊ लागला. ही बाब चालकाच्या लक्षात आली. चालकाने जराही विलंब न लावता वेळीच कार रस्त्याच्या बाजूला थांबवली आणि कारमधील दोन प्रवाशांनाही तत्काल उतरवले. बघता बघता धूर वाढत गेला आणि काही क्षणांतच कारने पेट घेतला. त्यानंतर कारमधील झाला.
क्लिक करा आणि वाचा-
पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी
मरीन ड्राइव्ह येथे असलेल्या मफतलाल चौकाजवळ चालत्या गाडीला आग लागली. गाडीने पेट घेतल्यानंतर गाडीमधील असलेल्या सीएनजी किटचा स्फोटझाला. या स्फोटात एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
क्लिक करा आणि वाचा-
या घटनेबाबत कारच्या चालकाने माहिती देताना सांगितले की, मी विमानतळाकडे जात होतो. जात असताना कारमधून हळूहळू धूर येताना मला दिसला. मी कार थांबवली आणि गाडीच्या बाहेर आलो. गाडीतील प्रवाशांना देखील मी उतरण्यास सांगितले. आणि पाणी मारू लागलो. मात्र, फक्त पाच मिनिटात आग भडकली. त्यानंतर गॅसचा सिलेंडरचा स्फोट झाला. मात्र सुदैवाने यात कोणाही जखमी झाले नाही.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times