पाचोरा तालुक्यातील नेरी येथील सचिन भगवान पाटील (वय २५) हा तरुण आपल्या दोन मित्रांसह गावालगत असलेल्या गडद नदीत पोहण्यासाठी गेला होता. दरम्यान सचिन याने पोहण्यासाठी नदीत उडी घेतली. मात्र, त्यानतंर तो पाण्याच्या प्रवाहातून बाहेर आलाच नाही. हे पाहून त्याच्यासोबत आलेले दोघे मित्र घाबरले. त्यांनी आरडा-ओरड करुन गावात जाऊन ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानतंर त्याचा शोध घेतला जात आहे.
रात्री उशीरापर्यंत हा तरुण सापडलेला नव्हता. नदी काठच्या गावकऱ्यांना तरुण आढळल्यास पाचोरा पोलीस ठाण्यात संपर्क करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
जळगाव जिल्ह्यात पावसाचा कहर कायम; पूर्णा नदीला पूर
हतनुर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पूर्णा नदीस मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. तसंच परिसरात अतिवृष्टी झालेली असल्याने हतनुर धरणाचे ४१ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेले आहेत. पूर्णा नदीतून सुमारे ४ लक्ष क्युसेस पाण्याचा विसर्ग बुधवारी सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजे दरम्यान केला गेल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times