नवी दिल्लीः अतुल केशप यांचा बुधवारी कार्यालयातील शवेटचा दिवस होता. आपला अतिशय व्यग्र कार्यक्रम बाजूला सारून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीसाठी वेळ काढला. आणि भागवत यांच्यात बराच चर्चा झाली. राष्ट्रनिर्मितीच्या आरएसएसच्या विचार ऐकून ते भारावून गेले.

भारतातील विविधता, लोकशाही आणि सर्वसमावेशकता यावर मोहन भागवत यांच्याशी खूप चांगली चर्चा झाली. ही पारंपरिक मूल्ये एका महान राष्ट्राची ऊर्जा आणि शक्ती कशी बनू शकतात हे त्यांनी स्पष्ट केलं, असं केशप म्हणाले.

केशप यांनी मोहन भागवत यांची भेट घेतल्याचा एक फोटो शेअर केला आहे. केशप यांच्याशी बोलताना भागवत या फोटोत दिसत आहेत. आपलं म्हणणं मांडत आहेत. केशप यांचं संपूर्ण लक्ष हे त्यांच्या बोलण्याकडे आहे.

अमेरिकेचे राजदूत केशप यांनी एक ट्वीटही शेअर केलं. आज रात्री आपण वॉशिंग्टनला रवाना होत आहोत. भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून काम करणं हा गौरव आहे, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. भारत-अमेरिकेचे संबंध घट्ट आहेत आणि ते तसेच राहतील, असं केशप म्हणाले.

मोहन भागवत हे आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. अशावेळी केशप आणि भागवत यांची ही भेट झाली आहे. भारतातील हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते. प्रत्येक भारतीय हिंदू आहे. समजूतदार मुस्लिम नेत्यांनी कट्टरपंथियांविरोधात एकजुटीने उभं राहिलं पाहिजे. हिंदू शब्द हा मातृभूमी, पूर्वज आणि भारतीय संस्कृतीच्या समान आहे. यातून इतर विचारांचा अपमान होत नाही. आपण मुस्लिम वर्चस्वाबाब नाही तर भारताच्या वर्चस्वाबाबत विचार केला पाहिजे, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here