महापुरुषांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेबाबत केलेल्या बांगड्यांच्या भाषेला आदित्य यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिलं होतं. ‘मनानं सर्वाधिक मजबूत असलेल्या महिला बांगड्या घालतात. ते कुठल्याही कमकुवतपणाचं लक्षण नाही. त्यामुळं फडणवीसांना आपली मानसिकता बदलावी, असं आदित्य यांनी सुनावलं होतं. आदित्य यांच्या या ट्विटवर यांनी आदित्य ठाकरेंना रेशमी किड्याची उपमा दिली होती. ‘रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ कधीच समजणार नाही, कारण पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन ‘रेशमी’ आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते,’ असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.
वाचा:
अमृता फडणवीस यांच्या या शेलक्या शब्दांतील टीकेला शिवसेनेच्या प्रवक्त्या यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे हे प्रबोधनकार, बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांचा वारसा लाभलेलं व्यक्तिमत्त्व आहे. वडील मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी (गायनाचे) छंद पूर्ण केले नाहीत. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा छंद जोपासला आहे,’ असं कायंदे यांनी म्हटलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times