हिरानंदानी इस्टेटमधील ए वन हाऊसिंग सोसायटीमध्ये सातव्या मजल्यावर राहणारे पुरुषोत्तम नाम्बियार गंभीर आजाराने ग्रस्त होते. त्यामुळे नुकताच त्यांचा मुलगा कॅनडावरुन घरी आला होता. मुलगी आणि जावई देखील आले होते. गुरुवारी सकाळी ८.१५ वाजता पुरषोत्तम यांचे राहत्या घरीच आजाराने निधन झालं. पतीच्या निधनाचा मानसिक धक्का सहन न झाल्याने यु. के. गीता यांनी ८.३० वाजताच्या सुमारास घरातील हॉलच्या गॅलरीतून खाली उडी मारली.
उपचारासाठी तात्काळ त्यांना सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नाम्बियार कुटुंब मूळचे केरळचं आहे. ज्यावेळी पोलीस नाम्बियार यांच्या घरी गेले आणि घरात एकाच वेळी दोघांचे मृतदेह पाहून पोलिसांना देखील अत्यंत गहिवरुन आलं. या हृदयद्रावक घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यु. के. गीता यांनी आत्महत्याच केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times