पुणे: नर्सच्या वेशात आलेल्या महिलेने पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून तीन महिन्यांच्या मुलीचं अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल करत एका महिलेला ताब्यात घेत मुलीची सुटका केली. (Three months baby abducted from Sassoon Hospital in Pune)

याबाबत २२ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला ही काही दिवसांपासून तिच्या तीन महिन्यांच्या मुलीवर उपचारासाठी येथे दाखल होती. ९ सप्टेंबरच्या मध्यरात्री नर्सच्या वेशभूषेत आलेली सव्वीस वर्षीय महिला आणि तिचा पती या दोघा आरोपींनी तीन महिन्यांच्या मुलीचे अपहरण केले. या प्रकरणी तत्काळ पोलिसांकडे तक्रार दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून संशयित महिलेला ताब्यात घेतला आहे. आरोपी पती-पत्नीला अपत्य होत नसल्यामुळे ससूनमधील तीन महिन्यांचं बाळ पळविल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयात चक्क नर्सच्या वेशभूषेत येऊन बाळ पळवलेला ससूनची सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न निर्माण झाला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here