रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा अत्यंत साधा आरास, मातीची, शाडूची मुर्ती हे खास वैशिष्ट्य जपणारी अनेक कुटूंब आहेत.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या माध्यमातून आम्ही दरवर्षी विशेष संकल्पना घेऊन करत असतात. यावर्षी खराब बॉक्सच्या पुठ्ठयाचे साधे मखर आहे. घरीच केलेली लाल मातीची मूर्ती तिचे विसर्जनही घरीच करून ती माती बागेत टाकून त्यात दरवर्षी एक झाड लावून खऱ्या अर्थाने पर्यावरण संतुलन जपण्याची कृती दापोली जालगाव येथील पर्यावरणापूरक संकल्पना राबविणारे अभ्यासक प्रशांत परांजपे कुटूंब गेली कित्येक वर्षे करत आहे.

शिक्षक प्रदीप अभ्यंकर यांच्याकडेही दरवर्षी पर्यावरण पूरक आरास करून शाडूच्या मातीची मूर्ती हे खास वैशिष्ट्य असते. यावर्षी पुठ्ठा, फोमचा वापर करून अत्यंत साधी आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

दापोली तालुक्यातील प्रसिद्ध असलेले व्यापारी जोशी ब्रदर्स यांच्या घरी गेली जवळपास सुमारे शंभर वर्षांची परंपरा लाभली आहे. शाडू अथवा साध्या मातीची बाप्पाची मूर्ती विराजमान होते. पुन्हा वापरात येईल असा पर्यावरणपूरक आरास केला जातो. निर्माल्यही नदीत, तलावात न टाकता गॅस निर्मिती करणाऱ्या टाकीत टाकले जाते.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here