मुंबईतील साकीनाका परिसरात मध्यरात्री ही घटना घडल्याची माहिती आहे. पहाटे साधारण ३ वाजेच्या सुमारास पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता पीडित महिला रक्ताच्या थारोळ्यात आढळली. पोलिसांनी ताबोडतोब सदर महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. या महिलेवर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र मोठी इजा झाल्याने महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
नराधमांनी महिलेवर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर तिच्या गुप्तांगात रॉड घुसवण्याचं अमानवी कृत्य केलं, अशी प्राथमिक माहिती आहे. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि एका आरोपीला ताब्यात घेतलं. या प्रकरणात इतरही काही आरोपींचा समावेश असल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, मुंबईत घडलेल्या या धक्कादायक घटनेनं राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसंच याप्रकरणी उर्वरित आरोपींनाही लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times