नवी दिल्लीः काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधींनी गुरुवारी माता वैष्णो देवीचे दर्शन घेतले. यानंतर आपण काश्मिरी पंडित असल्याचं ते म्हणाले. यावरून भाजपने राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी तर मुघल बादशाह अकबरही गेला होता. राहुल गांधी स्वतःला काश्मिरी पंडित म्हणवतात. मग आजोबा फिरोज गांधींना राहुल गांधी विसरले का? स्वतःला काश्मिरी पंडित म्हणवणारे मुस्लिम विचारवंतांमध्ये गेल्यावर म्हणतात आपला पक्ष मुस्लिमांचा आहे. जर असे लोक देशाचं नेतृत्व करण्याचा दावा करत असतील तर यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो, अशी टीका भाजप प्रवक्ते राजीव जेटलींनी केली. वृत्तवाहिनीवरील एका चर्चेत ते बोलत होते.

मी एक काश्मीर पंडित असल्याचं ते व्यासपीठावरून बोलतात. मुस्लिम विचारवंतामध्ये गेल्यावर म्हणतात आपण मुस्लिम आहोत आणि आपला पक्ष मुस्लिमांचा आहे. पण तुम्ही यातून आपल्या वडिलांचा सान्मान करू शकत नाही. धर्मनिरपक्षे म्हणणाऱ्या काँग्रेला पक्षाला एखाद्या धर्माशी जोडत आहात. असे लोक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपली जात आणि आडनाव बदलतात. यानंतर देशाचे नेतृत्व करण्याचा दावा करतात. ही देशाच्या जनतेशी केलेली एक चेष्टा आहे, असं राजीव जेटली म्हणाले.

माता वैष्णो देवीच्या दरबारात कुणीही जाऊ शकतं. माता वैष्णो देवीचे दर्शन घेण्यासाठी अकबरही गेला होता. देवीच्या दर्शनासाठी जो जातो त्याला आशीर्वाद मिळतो. राहुल गांधीही गेले. त्यांचे स्वागतच आहे. यावरून राजकारण करणं योग्य नाही, असं जेटली बोलले.

राहुल गांधींना आपल्या वडिलांच्या नावाचा अभिमान नाही. फिरोज गांधींची ओळख का मारली जात आहे. हे अतिशय खेदाची बाब आहे. मी स्वर्गीय फरदून जहांगीर घांडी ( GHANDY ) यांची लढाई लढत आहे. GHANDY हे फिरोज गांधींच्या वडिलांचे आडनाव होते. पण त्यांची ओळख मारली जात आहे, असा आरोप भाजप प्रवक्ते राजीव जेटलींनी केला.

दोन दिवसांपूर्वी होती फिरोज गांधींची पुण्यतिथी

संयोगाने राहुल गांधींचे आजोबा फिरोज गांधींची बुधवारी ६१ वी पुण्यतिथी होती. प्रयागराजमधील ममफोर्ड गंजमध्ये एक कब्रस्तान आहे. तिथे फोरज गांधींची समाधी आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here