: सरावासाठी मैदानावर आलेल्या दोन खेळाडूंचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला आहे, तर अन्य एकजण गंभीर झाला आहे. ही घटना खापरखेडा येथील चनकापूर परिसरात शुक्रवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास घडली. तन्मय दहीकर आणि अनुज कुशवाह अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चनकापूर येथील क्रीडा मैदानावर अनेक सरावासाठी येतात. येथे काही जण धावण्याचा सराव करतात तर अन्य काही जण क्रिकेट, फुटबॉल असे खेळ खेळतात. तन्मय आणि अनुजसुद्धा सरावासाठीच आले होते. संध्याकाळी पावसाळी वातावरण तयार झालं होतं. यावेळी वीज कोसळल्याने तन्मय आणि अनुजचा जागीच मृत्यू झाला. तसंच सक्षम गोठीफोडे नावाचा अन्य खेळाडू गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

खापरखेडा पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तन्मय आणि अनुज यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत केली जाईल, अशी माहिती सावनेरचे तहसीलदार सतीश मसाळ यांनी दिली.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून क्रीडाप्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here