नवी दिल्लीः ऑनलाइन पोर्टल ‘न्यूज लाँड्री’ आणि ‘न्यूज क्लिक’ च्या ऑफिसमध्ये शुक्रवारी प्राप्तीकर विभागाची () पथकं दाखल झाली. प्राप्तीकर विभागाने कर चोरी प्रकरणी तपासणीची कारवाई केली होती. प्राप्तीकर विभागाने अधिकृतपणे याला दुजोरा दिला आहे. प्राप्तीकर विभागाची पथकं दोन्ही वेबसाइटच्या ऑफिसमध्ये गेली होती, असं प्राप्तीकर विभागाकडून सांगण्यात आलंय. पण ही कारवाई छापा नसून ‘सर्वे’ असल्याचं प्राप्तीकर विभागाने म्हटलं आहे.

‘न्यूज लाँड्री’ आणि ‘न्यूज क्लिक’ च्या कार्यालयांमध्ये विभागाची पथकं तपासणी करत आहेत, असं प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. दोन्ही वेबसाइटसंबंधी खात्यांची तपासणी केली जात आहे. दोन्ही संस्थांचा कर परतावा आणि इतर देणींची तपासणी करण्यासाठी प्राप्तीकर विभागाची पथकं गेली होती, असं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. कर परताव्यासंबंधी काही तपशीलाच्या पडताळणीसाठी ही तपासणी केली, असं प्राप्तीकर विभागाच्या सूत्रांनी सांगितलं.

‘न्यूज लाँड्री’ने प्राप्तीकर विभागाच्या कारवाईवर आतापर्यंत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण एका कर्मचाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली. शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता प्राप्तीकर विभागाचे कर्मचारी आले होते. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ४ ते ५ कर्मचाऱ्यांचे मोबाइल आणि लॅपटॉपही घेऊन घेले. या कर्मचाऱ्यांना बाहेर कुणाशी बोलण्यापासून रोखण्यात आलं होतं, तो कर्मचारी म्हणाला.

‘न्यूज क्लिक’च्या कर्मचाऱ्याने दिला दुजोरा

‘न्यूज क्लिक’चे मुख्य संपादक प्रबीर पुरुकायस्थ यांचा फोन स्वीच ऑफ आहे. पण प्राप्तीकर विभागाचं पथक आल्याची माहिती मिळाली, असं वेबसाइटसाठी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलंय. बहुतेक कर्मचारी वर्क फ्रॉम होम आहेत.

न्यूज क्लिक आणि तिच्या संस्थापकांवर छापा मारला होता

दिल्ली पोलिसांच्या एफआयआरनंतर ईडीने ‘न्यूज क्लिक’ वेबसाइट आणि तिच्या संस्थापकांवर मनी लाँड्रींग प्रकरणी छापा मारला होता. २०१८ मध्ये अमेरिकेची कंपनी वर्ल्डवाइड मीडिया होल्डिंग्सकडून ९.९५ कोटी रूपये प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (FDI) मिळवल्याचा आरोप आहे. त्यावेळी ईडीने न्यूज क्लिकचे मुख्य संपादक प्रबीर यांच्या घरी छापा टाकला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here