मुंबईः मुंबईतील साकीनाका (Saki Naka) परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता. नेत्या यांनी याप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. (Nirbhaya-like horror)

आरोपीनं एका टेम्पोमध्ये महिलेवर बलात्कार केला.प्राथमिक तपासात तिच्यावर बलात्कार झाल्याचे आणि गुप्तांगात लोखंडी रॉड घालण्यात आल्याचे आढळले. आज उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. भाजपनंही राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.

वाचाः

चित्रा वाघ यांनी ट्वीट करत या प्रकरणी दुखः व्यक्त केलं आहे. ‘साकीनाका पिडीतेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. माफ कर ताई आम्हाला कुठल्या वेदनेतून गेली असशील याची कल्पना करवत नाही पण या मुर्दाड सरकार व व्यवस्थेला याचं काही घेणंदेणं नाही त्यांच्यासाठी तुझा मृत्यू म्हणजे फक्त अजून एक नंबर. लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतांना. नाही वाचवू शकलो तुला,’ अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी केली आहे.

वाचाः

या प्रकरणी मोहन चौहान (वय ४५) यास अटक करण्यात आली आहे. चौहान याने एका टेम्पोमध्ये महिलेवर बलात्कार केला. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. एक व्यक्ती महिलेला मारहाण करीत असल्याचा फोन पोलिस नियंत्रण कक्षाला पहाटेच्या सुमारास करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. तिला तातडीने राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक तपासात तिच्यावर बलात्कार झाल्याचे आणि गुप्तांगात लोखंडी रॉड घालण्यात आल्याचे आढळले. संबंधित टेम्पोमध्येही रक्त आढळले आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here