अमरावतीः मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यानंतर महाराष्ट्रात संताप व्यक्त होतं असताना आणखी एक घटना समोर आली आहे. अमरावतीत अल्पवयीन बलात्कार पीडितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे त्यावेळी ती सात महिन्यांची गर्भवती होती. महाराष्ट्रात घडलेल्या या दोन घटनांमुळं सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

अमरावतीतील दर्यापूर येथे ही घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीशी नराधमाने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. ही अल्पवयीन मुलगी १७ वर्षांची होती. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. तर पोस्को अंतर्गत गुन्हा देखील दाखल केला आहे. या संदर्भात अधिक तपास येवदा पोलीस करत आहेत.

वाचाः

पीडित मुलगी आपल्या आई- वडिलांसह राहत होती. या मुलीला एका तरुणानं प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. तसंच, या तरुणीला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर ही मुलगी सात महिन्यांची गर्भवती होती. ही बाब घरच्यांना माहिती नव्हती. मुलीने आत्महत्या केल्यानंतर रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. बदनामीच्या भीतीपोटी मुलीने गळफास लावत आत्महत्या केल्याची शक्यता निर्माण होत आहे.

वाचाः

मुंबईतील बलात्कार पीडितेचा मृत्यू

मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी मोहन चौहान (वय ४५) यास अटक करण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here