संगमनेर येथे एका कार्यक्रमासाठी थोरात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना या विषयावर विचारले असता थोरात म्हणाले, ‘काँग्रेस हा केवळ पक्ष नसून राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाशी निगडीत असलेली एक विचारधारा आहे. आज कदाचित कठीण परिस्थिती आली असेल, ती विचारधारेला आलेली आहे. धर्मांधता आणि जातीयवादाचा व्हायरस आज देशात घुसलेला दिसत आहे. म्हणून कठीण परिस्थितीत आम्ही दिसत असू मात्र एक दिवस काँग्रेस पुन्हा उभारी घेईल, या बाबतीत शंका बाळगण्याचे कारण नाही. कोणीही तशी शंका बाळगू नये. शरद पवार यांनी त्यांच्या पद्धतीने मांडणी केली आहे. मात्र, या धर्मांधतेच्या व्हायरसमुळे काँग्रेसवर ही वेळ आल्याचे सर्वांनी ओळखून घेतले पाहिजे. हा व्हायरस काढून टाकण्याची जबाबदारी एकट्या काँग्रेसची नाही.’
क्लिक करा आणि वाचा-
‘राज्य घटना आणि लोकशाही टिकविण्यासाठी या देशातील प्रत्येक नागरिकाची ती जबाबदारी आहे. नाना पटोले आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी त्यांच्या पद्धतीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर मी बोलू इच्छित नाही. मात्र, ही विचारधारेची लढाई आहे. आपल्याला देश कशा पद्धतीने चालवायचा आहे, आपली लोकशाही, आपली राज्यघटना कशी वाचवायची यासाठी आमची ही लढाई शेवटपर्यंत चालू राहील. आम्ही यात हार मानणार नाही, लढाई करत राहू,’ असेही थोरात एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times