उल्हासनगर (ठाणे): मुंबई, पुणे, अमरावती येथील बलात्काराच्या प्रकरणांनी महाराष्ट्र सुन्न झालेला असतानाच काही तासांतच आता ठाणे जिल्हा देखील बलात्काराच्या घटनेने हादरून गेला आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरातील रेल्वे स्थानक परिसरात हा संतापजनक प्रकार घडला. उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात एका नराधमाने एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका पडक्या घरात बलात्कार केला. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी आरोपी दादा उर्फ श्रीकांत गायकवाड याला अटक केली आहे. (a 14 years old minor girl raped in ulhasnagar in thane district accused arrested)

या धक्कादायक घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, उल्हासनगर स्थानकास लागून असलेल्या स्कायवॉकवर ही पीडित अल्पवयीन मुलगी उभी होती. ही मुलगी शिर्डीहून कल्याण येथे एका खासगी बसने आली होती. स्कायवॉकवर तिला तिचेदोन मित्र भेटले.

क्लिक करा आणि वाचा-
त्यावेळी एक तरुण तिच्या जवळ आला. त्याच्या हातात हातोडा होता. या हातोड्याचा वापर करत त्याने तिच्या मित्रांना धमकावले. त्यानंतर ते मित्र पळून गेले. त्यानंतर त्या तरुणाने तिला जबरदस्ती एका निर्जन स्थळी नेले. त्या ठिकाणी त्याने मुलीला बेदम मारहाण केली. नंतर तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर आरोपी मुलीला घटनास्थळी तसेच सोडले आणि तो पळून गेला.

क्लिक करा आणि वाचा-
धक्कादायक म्हणजे ही मुलगी पहाटेपर्यंत त्या पडक्या घरातच होती. त्यानंतर तिने आपल्या मित्रांना फोन केला आणि आपल्यावर बलात्कार झाल्याची माहिती दिली.

संबंधित घटनेची माहिती मिळताच कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक वाल्मीक शार्दुल यांनी या घटनेचा तपास सुरु झाला. पोलिसांनी या प्रकरणी पॉस्कोखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी दादा उर्फ श्रीकांत गायकवाड याला अटक केली. गायकवाडने आपला गुन्हा कबूल केला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here