म. टा. प्रतिनिधी,

सांगलीतील विश्रामबाग परिसरात राहणाऱ्या प्रसिद्ध डॉक्टर नलिनी नाडकर्णी यांच्या घरात घुसून चाकू गळ्याला लावू दरोडा टाकल्याची घटना सात दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी केली आहे. अटकेतील पाच जणांकडून ५ लाख ९७ हजारांचे दागिने, ३७ हजारांचा मोबाईल, ८ हजार रुपये रोख असा एकूण ७ लाख ४२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ( in have arrested five people for )

अमित चंद्रकांत पाचोरे (वय २८, रा. नांद्रे), सचिन शिवाजी फोंडे (वय २७, रा. नांद्रे), रोहित देवगोंडा पाटील (वय २३, रा. वसगडे), निखिल राजाराम पाटील (वय ३१, रा. खटाव, ता. पलूस) आणि पायल युवराज पाटील (वय ३१, रा. सांगली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत. पायल पाचोरे ही डॉ. नाडकर्णी यांच्या ओळखीची होती. पायल आणि तिचा मित्र निखिल यांनीच कट रचून दरोड्याचा गुन्हा घडवून आणल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ५ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास डॉ. नलिनी नाडकर्णी घरामध्ये एकटया असताना तिघांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यांच्या गळ्याला धारदार कोयता लावून जीवे मारण्याची धमकी देत २५ तोळे सोने व रोख रक्कम लुटली होती.

क्लिक करा आणि वाचा-
गुन्हा घडलेल्या ठिकाणी कोणताही पुरावा मिळू नये यासाठी आरोपींनी सर्व पुरावे नष्ट केले होते. त्यामुळे या प्रकरणी तपास करणे पोलिसांपुढे आव्हान होते. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील हे तपास करत असताना त्यांना माहिती मिळाली की, नलिनी नाडकर्णी यांच्या ओळखीची पायल पाटील होती. नाडकर्णी यांच्या घरी त्यांचे सारखे येणे-जाणे होते. पायल पाटील हिने तिचा मित्र निखिल पाटील याच्या सोबत कट रचून घरात दरोडा टाकण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी पाचोरे, फोंडे आणि रोहित पाटील यांची मदत घेतली. त्यावरून नांद्रे, वसगडे, खटाव आणि सांगली येथे छापा टाकून पाच जणांना अटक केली.

क्लिक करा आणि वाचा-
पाच जणांकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर सर्वांनी मैत्रिणीच्या सांगण्यावरून गुन्हा केल्याची कबुली दिली. या पाचही जणांकडून पोलिसांनी चोरीतील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, गुन्हा करण्यासाठी वापरलेले ५ मोबाईल, ४ मोटारसायकली व एक कोयता असा एकूण ७ लाख ४२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी, सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील, पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे, आदिनाथ माने, दरिबा बंडगर, अक्षय ताटे, आदींनी केली.

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here