चंद्रपूर: जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रात बिबट मृतावस्थेत आढळल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड खुर्द उपवनक्षेत्र अंतर्गत विरखल येथील शेतकरी ढिवरूजी चीमुरकर हे काल सायंकाळी आपल्या शेतातील पीक पाहण्यासाठी गेले असता, त्यांना लगतच असलेल्या भैयाजी वाळूजी देशमुख यांच्या शेतामध्ये बिबट मृतावस्थेत असल्याचे आढळून आले.

मृतावस्थेतील बिबट्या पाहिल्यानंतर त्यांनी तात्काळ ही माहिती देशमुख यांना दिली. भैय्याजी देशमुख यांनी विलंब न करता बिबट्या मृतावस्थेत असल्याचे वन विभागाला कळविले. रात्री वनपरिक्षेत्र अधिकारी कामडी यांच्या मार्गदर्शनाखाली व्याहाड येथील क्षेत्र सहाय्यक रवी सूर्यवंशी, वनरक्षक मेश्राम, सोनेकर, प्रत्यक्ष पाहणी करून त्या बिबट्याला शवविच्छेदनासाठी येथे हलवीले. यावेळी पूनम झाडे,भैय्याजी देशमुख, चीमुरकर, यशवंत बारसागडे आदी उपस्थित होते.

वाचाः
या नेमका कशामुळे झाला हे कळू शकले नाही. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात वन्यजीव सुरक्षित नसल्याचे आढळून येत आहे. नुकतेच वाघाची शिकार करून अवयव विक्री करणारी टोळी वन विभागाच्या जाळ्यात अडकली आहे हे विशेष. त्यामुळं या बिबट्याच्या मृत्यू प्रकरणीही चिंता व्यक्त केली जात आहे.

वाचाः

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here