अहमदनगर: मुंबईतील साकीनाका येथील महिलेवरील अत्याचार आणि खुनाच्या घटनेचा निषेध करण्यासाठी अहमदनगरमधील स्वयंसेवी संस्थांच्या महासंघातर्फे आंदोलन करण्यात आले. महिलांवरील वाढत्या अत्याचाराला न्याययंत्रणेसोबत नागरिकही तेवढेच जाबाबदार आहेत, असे म्हणत नागरिकांच्या वतीने नागरिकांनाच निवेदन देण्यात आले. (Statement by the citizens themselves to stop the increasing )

शहरातील वाडियापार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या घटना वाढण्यास आपण नागरिकही तेवढेच जबाबदार आहोत, असे म्हणत नागरिकांच्या नावेच निवेदन देण्यात आले. नागरिक म्हणून आपल्या भूमिकेत सुधारणा करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, आजचे निवेदन हे सरकारला किंवा शासकीय यंत्रणेला उद्देशून नाही. आम्ही कोणाला काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. टीका, आरोपप्रत्यारोप, सूचना हे सर्व आम्हाला निरर्थक वाटते. म्हणून आम्ही नागरिक हे निवेदन आपल्याच सर्व नागरिकांना देत आहोत.

क्लिक करा आणि वाचा-
मागील आठवड्यात आपल्याला अत्यंत अस्वस्थ आणि सुन्न करणाऱ्या घटना घडल्या आहेत. मुंबईतील साकीनाका येथे एका महिलेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. मोहन चौहान या आरोपीने तिला अत्याचारानंतर ठार केले. या महिलेला दोन मुले असून कुटुंब उघड्यावर पडले आहे. यातील इतर आरोपी फरारी आहेत. मागील आठवड्यात पुणे येथे अल्पवयीन मुलीवर पंधराहून जास्त लोकांनी सलग चार दिवस सामूहिक अत्याचार केला. पुण्यातील दुसऱ्या घटनेत सहा वर्षाच्या बालिकेवर एका रिक्षाचालकाने अत्याचार केला. अमरावतीमध्येही अशीच घटना धडली आहे. दिल्लीतील निर्भयावरील अत्याचार आणि खुनाच्या घटनेस सात वर्षे उलटली. तरीही आता रोजच निर्भया अत्याचार झेलत मरत आहेत. आपण नागरिक काय करीत आहोत ?, असा सवाल निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.

क्लिक करा आणि वाचा-
पोलिसांना आणि न्यायव्यवस्थेला आपण दोष देतो. परंतु जेव्हा आपल्या अवतीभवती घटना घडत असतात. तेव्हा आपण त्यावर काय प्रतिसाद देतो. आपण स्वतःहून हस्तक्षेप करीत नाही. त्वरित मदतीला जाऊन प्रतिकार करीत नाही. कारण ती दुसऱ्या कोणाची तरी पत्नी- मुलगी- बहीण किंवा आई असते. आपण साक्षीदार पंच तक्रारदार व्हायला तयार नसतो. जोपर्यंत आपण बदलणार नाही, तोपर्यंत काहीच बदलणार नाही. सरकार आणि पोलिस यंत्रणेचा धाक गुन्हेगारांना उरलेला नाही. त्यामुळे अशा घटना पुन्हा-पुन्हा घडत आहेत, असे निवेदनात म्हटले असून नागरिकांना जागृतपणे कृती करण्याचे आवाहन उपस्थितांना करण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here