म. टा. प्रतिनिधी, जळगावः आईच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत आईशी वाद घावून मारहाण करणाऱ्या बापाचा संतप्त दोघां मुलांनी चाकूने भोसकून खून केल्याची घटना रविवारी सकाळी १०.३० वाजता निमखेडी रस्त्यावर घडली. याचवेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या पोलिसांच्या समोरच ही घटना घडल्याने त्याने तात्काळ संशयित मुलांच्या हातात बेड्या घातल्यात. प्रेमसिंग अभयसिंग राठोड (वय ५०, रा. निमखेडी रोड, मुळ रा. घनशामपुर, ता. खकनार, जि. बुरहणापूर) असे मृत वडीलांचे नाव आहे. त्यांची मुले गोपाळ (वय १८) व दीपक (वय २२) यांनी हा खून केला आहे.

प्रेमसिंग राठोड यांच्या पत्नी बसंतीबाई व दीपक, गोपाळ, कविता, शिवाणी ही चार मुले गेल्या दोन वर्षांपासून निमखेडी रस्त्यावरील लता राजेंद्र लुंकड यांच्या घरी भाड्याने राहतात. घरासमोरील शेडमध्ये विशाल राजेंद्र चोपडा यांच्या मालकीचे गुरे राखण्याचे काम राठोड कुटुंबीय करीत होते. तसेच गोपाळ व दीपक हे दोघे मजुरी देखील करायचे. दरम्यान, प्रेमसिंग हे नेहमी पत्नी बसंतीबाई यांच्या चारीत्र्यावर संशय घेत असत. त्यांच्या कानाची शस्त्रक्रीया करायची असल्यामुळे रविवारी सकाळी दीपक व गोपाळ या दोन्ही मुलांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घेऊन जाणार होते. यावेळी प्रेमसिंग यांनी पत्नी बसंतीबाई हिला देखील सोबत घेण्याचे सांगीतले. यावरुन पुन्हा एकदा पती-पत्नीमध्ये वाद झाले. प्रेमसिंग यांनी पत्नीवर संशय घेतल्यामुळे मुलांना राग आला. प्रेमसिंग यांनी पत्नी व मोठा मुलगा दीपक यांना मारहाण करण्यास सुरूवात केली होती. यामुळे पिता-पुत्रांत झटापट सुरू झाली. प्रेमसिंग यांनी घरातून चाकु आणून गोपाळवर वार करण्याचा प्रयत्न केला. गोपाळने चाकु हिसकाऊन घेतल्याने त्यांनी मोठ्या काठीने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. वाद वाढल्याने गोपाळने थेट वाडीलांच्या पोट, छाती व पायावर चाकुने सपासप वार केले. यात ते जमिनीवर कोसळून जागेवरच त्यांचा मृत्यू झाला.

वाचाः
भररस्त्यावर ही घटना घडत असताना तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी शाम बोरसे याच रस्त्याने दुचाकीने येत होते. त्यांनी पाहीले असात, यावेळी प्रेमसिंग रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तर गोपाळ हातात चाकु घेऊन तेथेच उभा होता. मोठा मुलगा दीपक हातात काठी घेऊन घटनास्थळावरच होता. गोपाळ याने चाकुने वार केल्याचे बोरसे यांना दुचाकीवरुनच दिसले होते. त्यामुळे बोरसे यांनी तात्काळ दीपक व गोपाळ या दोघांना पकडून ठेवत पळुन जाऊ नये म्हणून त्यांच्या हातात बेड्या घातल्या. पोलिस ठाण्यात फोन करुन घटनेची माहिती दिली. थोड्याच पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह पथक घटनास्थळी आले. त्यांनी गोपाळ व दीपक या दोघांना ताब्यात घेतले. तर घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी मृत प्रेमसिंग यांचे भाऊ रोहिदास अभयसिंग राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात गोपाळ व दीपक विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक कुंभार तपास करीत आहेत.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here