गांधीनगरः भूपेंद्र पटेल हे गुजरातचे नवे मुख्यमंत्री होणार ( ) आहेत. भूपेंद्र पटेल हे उद्या दुपारी १ वाजत मुख्यमंत्रीपदाची ( , ) शपथ घेतील, असं सांगण्यात येत आहे. पण उपमुख्यमंत्रीपदाबाबत अद्याप भाजपकडून कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे उपमुख्यमंत्रीपदाबाबत संभ्रमाची स्थिती आहे.

भूपेंद्र पटेल निवडीनंतर म्हणाले…

मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल भूपेंद्र पटेल यांनी पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आभार मानले आहेत. तसंच वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. राज्यात जी विकासकामं सुरू आहेत, ते पुढे नेली जातील. तसंच सर्वांना सोबत घेऊन काम करेन, असं भूपेंद्र पटेल म्हणाले. भूपेंद्र पटेल हे घाटलोडिया मतदारसंघाचे आमदार आहेत.

अमित शहांनी दिल्या शुभेच्छा…

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भूपेंद्र पटेल यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. गुजरात भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल भूपेंद्र पटेल यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वात राज्याचा विकासाची घोडदौड यापुढेही सुरू राहील. तसंच राज्याला विकासाला नवी ऊर्जा आणि वेग मिळेल. सुशासन आणि लोककल्याणात गुजरात कायम आघाडीवर राहील, असा विश्वास अमित शहांनी व्यक्त केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here