वाचा:
मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरे यांनी सकाळीच फेसबुकवर पोस्ट टाकली होती. मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी, अशी सदिच्छा त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली होती. ज्यांच्या जयंतीदिनीचं औचित्य साधून मराठी भाषा दिन साजरा केला जातो, त्या कवी कुसुमाग्रजांनाही त्यांनी एका पोस्टद्वारे अभिवादन केलं. कविता, नाटक, कथा, कादंबरी, लघुनिबंध असे विविध वाङ्मयप्रकार कौशल्याने हाताळत साहित्याच्या सर्व प्रांतात आपल्या प्रतिभेचा दरारा निर्माण करणारे कुसुमाग्रज हे मराठी साहित्य आणि संस्कृतीचा मानदंडच, असं म्हणत आपल्या पक्षातर्फे राज यांनी कुसुमाग्रजांना अभिवादन केलं आहे.
या दोन पोस्टनंतर राज ठाकरे यांनी एका काश्मिरी मुलीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात शमीम अख्तर ही काश्मिरी तरुणी ‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा… सांडीं तू अवगुणू रे भ्रमरा…’ हे गीत गाताना दिसत आहे. संत ज्ञानेश्वरांची ही रचना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली व गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेली आहे. काश्मिरी वाद्यामेळ्याचा वापर करून शमीम अख्तर ती गायली आहे.
शमीम अख्तरचा हा व्हिडिओ राज ठाकरे यांनी आवर्जून शेअर केला आहे. एका काश्मिरी तरुणीला मराठीतील ही रचना गावीशी वाटणं हा काश्मिरीयतनं मराठीप्रति दाखवलेला आदर आहे. तो वृद्धिंगत होवो आणि आपल्या राज्याला आपल्या वैभवाची जाणीव करून देवो, अशी सदिच्छा राज यांनी व्यक्त केली आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times