मुंबई: राज्यात कालच्या तुलनेत आज (Coronavirus) बाधितांच्यादैनंदिन रुग्णसंख्या घट झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. शिवाय मृत्यूची संख्याही घसरली असून कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील थोडी कमी असल्याने आजची स्थिती तुलनेने दिलासादायक आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात २ हजार ७४० इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ३ हजार ६२३ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ३ हजार २३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या २ हजार ९७२ इतकी होती. तर, आज २७ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ४६ इतकी होती. (maharashtra registered 2740 new cases in a day with 3233 patients recovered and 27 deaths today)

आज राज्यात झालेल्या २७ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ०९ हजार ०२१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के इतके झाले आहे.

राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत घट

आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४९ हजार ८८० इतकी आहे. काल ही संख्या ५० हजार ४०० इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १३ हजार १०२ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात मात्र ही संख्या किंचित घटून ती ७ हजार ८५८ वर आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ४ हजार ९१९ वर खाली आली आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ६ हजार ६२५ अशी आहे. तर, सांगलीत एकूण १ हजार ८२६ अशी वाढली आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या २ हजार ६९६ इतकी आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here