अमरावती : विदर्भाची संत्री त्याच्या आंबट गोड चवीने जगप्रसिद्ध आहे. दरवर्षी संत्र्याला विदेशातही मोठी मागणी राहते. नागपुर व अमरावतीची संत्री म्हणून ही संत्री खरेदी करणारेही अनेकजण आहे. परंतु ही संत्री उत्पादन करणारा शेतकरी मात्र गेल्या अनेक वर्षांपासून संकटात सापडलेला आहे. सातत्याने होणारी संत्रा गळती व शंखअळीने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे.

सातत्याने सुरु असलेल्या धुवाधार पावसामुळे कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आले असतानाच तिकडे या पावसाचा फटका फळबागांना ही बसत आहे.विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी तालुक्यात सर्वाधिक संत्रा फळांचे उत्पादन घेतले जाते. परंतु सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे व वातावरणातील बदलामुळे संत्रा झाडांवर ही विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असून मागील तीन महिन्यांपासून संत्राची गळती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या लाखो रुपयाचा संत्रा हा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची शक्यता आहे.

सध्या संत्राला आंबिया बहार आला आहे. दरवर्षी प्रमाने यंदाही या शेतकऱ्यांनी संत्रा बागांवर लाखो रुपये खर्च केला होता. हजारो खर्च करून फवारणी या शेतकऱ्यानी केली परंतु यंदाही जुलै महिन्यापासून संत्रा गळतिला सुरवात झाल्याने निम्यापेक्षा जास्त संत्राची फळे हे गळून पडले आहेत. त्यामुळे लावलेले पैसे ही निघनार की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांन समोर उभा राहला आहे. अमरावती जिल्ह्यातील बहादा येथील संत्रा उत्पादक शेतकरी भाऊराव वानखडे यांच्याकडे १३०० संत्रा झाडे आहेत. मात्र, यंदा१२ ते १३ लाखांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित होतं मात्र संत्रा गळन व शंखअळीने त्यांच उत्पन्न पूर्णपणे घटनार आहे तर यावर उपाय योजना कृषी विभागाने करावी अशी मागणी त्यांनी केली.

दरवर्षी मोठ्या प्रमाणावर संत्रा गळती होते. परंतु यावर कृषी विभागाने मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. परंतु कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी संत्रा बागांमध्ये फिरकतही नसल्याचा आरोप देखील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. एकीकडे शासनाकडून संत्रा उत्पादन उत्पादनावर उपाययोजना केल्या जातील असे सांगितले जाते. परंतु वास्तविकता मात्र कृषी विभागाकडून कुठलाच मार्गदर्शन मिळत नसल्याची तक्रारही यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.

संत्रा बागांमध्ये संत्रा गळती बरोबरच शंकू अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आहे. या शंखू अळी मुळे संत्रा झाडांच्या साली खराब होत असून संत्रा झाडांच आयुष्यही कमी होत आहे. संत्रा झाडा वरील शंखु अळी वेचण्यासाठी प्रचंड खर्चही येत असल्याच संत्रा उत्पादक शेतकरी सांगतात.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here