म. टा. प्रतिनिधी,

क्षुल्लक वादातून तरुणासह त्याच्या कुटुंबीयांना नऊ जणांच्या टोळक्याने काल सोमवारी मारहाण केली. या घटनेनतंर मारहाण झालेल्या तरुणाने आज मंगळवारी सकाळी धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना म्हसावद गावाजवळ घडली. दरम्यान, घातपात झाला असल्याचा आरोप मृत तरुणाच्या वडीलांनी केला आहे. सागर गणेश खडसे (वय २२, रा. दहीगाव संत, ता. पाचोरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. (the young man committed suicide after being beaten by a group of 9 people in )

पाचोरा तालुक्यातील दहीगाव संत येथे काल सोमवारी दुपारी ४ वाजता खडसे यांच्या घरासमोर समाधान नामदेव शेजवळ व संदीप रघुनाथ कोळी हे दोघे दारु पिऊन शिवीगाळ करीत होते. यावेळी कल्पना गणेश खडसे यांनी दोघांना हटकले. याचा राग आल्यामुळे या दोघांसह राधाबाई कोळी, मथुराबाई नामदेव शेजवळ, नामदेव भिका शेजवळ यांनी खडसे दाम्पत्यासह त्यांचा मुलग सागर व समाधान या चौघांना बेदम मारहाण केली. शेजवळ यांनी लोहारा (ता. पाचोरा) येथुन काही नातेवाईकांना बोलावले. त्यांनी देखील खडसे कुटुंबीयांना मारहाण केली.

क्लिक करा आणि वाचा-
यानंतर कल्पना खडसे यांनी पाचोरा पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. १४ रोजी सकाळी ८.३० वाजता सागर खडसे याने म्हसावद गावाजळील रेल्वेरुळावर झोकुन देत आत्महत्या केली. दुपारी १२ वाजता मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला.

मृत तरुणाचे कुटुंबीय संतप्त; रुग्णालयत तणाव

दरम्यान, मारहाण करणाऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतल्याने रुग्णालयात तणाव निर्माण झाला. मृत सागरचे वडील गणेश खडसे यांनी यावेळी सांगीतले की, मारहाण झाल्यांनतर आम्ही पाचोरा पोलिस ठाण्यात गेलो होते. तेथे बीट हवालदार शाम पाटील यांनी गुन्हा दाखल करुन घेतला नाही. असभ्य भाषेत बोलून अपमान केला. शाम पाटील यांनी मारहाण करणाऱ्यांना पाठीशी घातले. त्यामुळे पाटील यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

क्लिक करा आणि वाचा-
तसेच आज मंगळवारी सकाळी संदीप कोळी व समाधान शेजवळ हे पुन्हा घरी आले होते. रात्री झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी माफी मागुन गुन्हा मागे घेण्याची विनंती मुलाकडे केली. गोड बोलुन मुलगा सागर याला घराबाहेर नेले. यांनतर ८.३० वाजता सागरचा मृतदेह रेल्वेरुळाजवळ आढळुन आला आहे. त्याने आत्महत्या केली नसून घातपात झाल्याचा आरोपही मृत तरुणाच्या वडीलांनी केला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here